कसा प्रकाश पाझरे
कसा प्रकाश पाझरे, कसा विरे हा अंधार
सहा ऋतू बदलती कोण आहे सूत्रधार
बीज मुठीत मावते, वृक्ष आकाश व्यापतो
उगमाचा थेंब पुढे रूप सागराचे होतो
हृदयात रातंदिन कोण छेडितसे तार
कशी भरती-ओहोटी, जळ वाहे कोणासाठी
बंद शिंपल्याच्या पोटी कसा जन्मा येई मोती
माय धरित्रीच्या कुशी सुवर्णाचा मणिहार
डोळे उघडता रंग, बंद होता अंतरंग
ज्याच्या हातात टिपरी त्याच्यासाठी श्रीरंग
रास झुले ब्रह्मांडाचा, रंग गंधाला बहर
सहा ऋतू बदलती कोण आहे सूत्रधार
बीज मुठीत मावते, वृक्ष आकाश व्यापतो
उगमाचा थेंब पुढे रूप सागराचे होतो
हृदयात रातंदिन कोण छेडितसे तार
कशी भरती-ओहोटी, जळ वाहे कोणासाठी
बंद शिंपल्याच्या पोटी कसा जन्मा येई मोती
माय धरित्रीच्या कुशी सुवर्णाचा मणिहार
डोळे उघडता रंग, बंद होता अंतरंग
ज्याच्या हातात टिपरी त्याच्यासाठी श्रीरंग
रास झुले ब्रह्मांडाचा, रंग गंधाला बहर
गीत | - | प्रवीण दवणे |
संगीत | - | प्रभाकर पंडित |
स्वर | - | साधना सरगम |
अल्बम | - | रंग जीवनाचे |
गीत प्रकार | - | भावगीत |