कसे हे घडले न कळे
कसे हे घडले न कळे मला
तुजवरी जीव माझा जडला
हास्यातील तव भाव आगळा
जीवा माझिया लावितो गळा
अशी कशी ही तुलाच ठाऊक मुलुख आगळी कला
कधी न बोलता एक अवाक्षर
फेकिशी मजवर नयनांचे शर
त्याच शरांनी व्याकूळ होतो जीव वेडावला
चित्र मानसी तुझे रेखिते
भावरंग मी त्यात निरखिते
त्या रंगातील तुझीच प्रतिमा ओढ लाविते मला
तुजवरी जीव माझा जडला
हास्यातील तव भाव आगळा
जीवा माझिया लावितो गळा
अशी कशी ही तुलाच ठाऊक मुलुख आगळी कला
कधी न बोलता एक अवाक्षर
फेकिशी मजवर नयनांचे शर
त्याच शरांनी व्याकूळ होतो जीव वेडावला
चित्र मानसी तुझे रेखिते
भावरंग मी त्यात निरखिते
त्या रंगातील तुझीच प्रतिमा ओढ लाविते मला
गीत | - | गुरुनाथ शेणई |
संगीत | - | रंजना प्रधान |
स्वर | - | उषा अत्रे-वाघ |
गीत प्रकार | - | भावगीत |
आगळा | - | अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण. |