A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कशी गौळण राधा बावरली

कशी गौळण राधा बावरली!
जलभरणा यमुना गेली
शीळ खुणेची अवचित आली
रोमांचित काया थरथरली!

कृष्ण सावळा गोरी राधा
कृष्णसख्याची जडली बाधा
कृष्णच नेत्री, कृष्णच गात्री
कृष्णात राधिका विरघळली!

लाजेचीही वसने फिटली
लोकांमधुनी राधा उठली
राधामोहन होता मीलन
हरिकांति तनूवर पांघरली!
गात्र - शरीराचा अवयव.
वसन - वस्‍त्र.

 

Random song suggestion
  सुमन कल्याणपूर