A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कशी गुलजार मनी फुलली

कशी गुलजार मनी फुलली प्रीतीची रागिणी
पौर्णिमा धुंद गहिरी बहरली जीवनी

भोवती गुंजले सूर ते मखमली
स्वप्‍न झंकारले उमलता पाकळी
ही कुणी घातली भर्जरी मोहिनी

भारल्या लोचनी मयसभा थाटली
वीजपंखी नशा अंतरी दाटली
थरथरे शर्वरी कैफ हा प्राशुनी

हात हाती असा राहू दे साजणी
गीत हे गुंफु दे आज प्राणांतुनी
रंगवू प्रणयराग जन्‍म हा झोकुनी
शर्वरी - रात्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.