कशी जांवू मी वृंदावना
कशी जाऊं मी वृंदावना ।
मुरली वाजवी ग कान्हा ॥१॥
पैलतिरीं हरी वाजवी मुरली ।
नदी भरली यमुना ॥२॥
कांसे पीताम्बर कस्तुरी टिळक ।
कुंडल शोभे काना ॥३॥
काय करूं बाई कोणाला सांगूं ।
नामाची सांगड आणा ॥४॥
नंदाच्या हरीनें कौतुक केलें ।
जाणे अंतरींच्या खुणा ॥५॥
एका जनार्दनीं मनीं ह्मणा ।
देवमाहात्म्य कळेना कोणा ॥६॥
मुरली वाजवी ग कान्हा ॥१॥
पैलतिरीं हरी वाजवी मुरली ।
नदी भरली यमुना ॥२॥
कांसे पीताम्बर कस्तुरी टिळक ।
कुंडल शोभे काना ॥३॥
काय करूं बाई कोणाला सांगूं ।
नामाची सांगड आणा ॥४॥
नंदाच्या हरीनें कौतुक केलें ।
जाणे अंतरींच्या खुणा ॥५॥
एका जनार्दनीं मनीं ह्मणा ।
देवमाहात्म्य कळेना कोणा ॥६॥
| गीत | - | संत एकनाथ |
| संगीत | - | स्नेहल भाटकर |
| स्वर | - | आशा भोसले |
| गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, संतवाणी |
| कुंडल | - | कानात घालायचे आभूषण. |
| कस्तुरी | - | एक अतिशय सुगंधी द्रव्य. |
| कांस | - | कंबर / कासोटा, ओटी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशा भोसले