A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कशी करू स्वागता

कशी करू स्वागता?
एकान्‍ताचा आरंभ कैसा? असते कशी सांगता?

कशी हसू मी? कैसी बोलू?
किती गतीने कैसी चालू?
धीटपणाने मिठी घालू का? कवळू तुज नाथा?

फुलते कळी की फुलवी वारा
चंद्र हसवी की हसवी तारा
कुठले आधी कुठले नंतर येईना सांगता !

कुणी न पुढती, कुणी न पाठी
घरात आहे मीच एकटी
प्रथमदर्शनी बोलायाचा भाव तरी कोणता?
सांगता - पूर्णता.