ओटी भरा ग ओटी भरा
जाणार आज मी माहेराला
ओटी भरा ग ओटी भरा,
माझी ओटी भरा
हिरवी चोळी, शालू हिरवा
हाती भरला हिरवा चुडा
हिरवा मरवा वेणीत घाला,
माझ्या वेणीत घाला
हिरव्या वेली हिरव्या रानी
मधे मी बसले हिरवी राणी
हिरवा चौरंग बसायला,
मला बसायला
माझी मला जड झाली पाउले
डोळ्यांभवती काळी वर्तुळे
आशीर्वाद तुझी द्या ग मला,
तुझी द्या ग मला
हसू नका ग गुपित सांगते
आज जरी मी एकली जाते
आणिन संगे युवराजाला,
माझ्या युवराजाला
ओटी भरा ग ओटी भरा,
माझी ओटी भरा
हिरवी चोळी, शालू हिरवा
हाती भरला हिरवा चुडा
हिरवा मरवा वेणीत घाला,
माझ्या वेणीत घाला
हिरव्या वेली हिरव्या रानी
मधे मी बसले हिरवी राणी
हिरवा चौरंग बसायला,
मला बसायला
माझी मला जड झाली पाउले
डोळ्यांभवती काळी वर्तुळे
आशीर्वाद तुझी द्या ग मला,
तुझी द्या ग मला
हसू नका ग गुपित सांगते
आज जरी मी एकली जाते
आणिन संगे युवराजाला,
माझ्या युवराजाला
गीत | - | मा. ग. पातकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | मोहनतारा अजिंक्य |
गीत प्रकार | - | भावगीत |