स्पर्श सांगेल सारी
स्पर्श सांगेल सारी कहाणी
शब्द बोलू नकोस आज राणी
संथ सागराच्या लाटा किनार्यास येती
फेनफुले वाळुवरती अंथरून जाती
धुंद हृदयातुनी आर्त गाणी
हात गुंफिलेले हाती, फुले लाज गाली
मुक्या भावनांना का ही नवी जाग आली
जन्मजन्मांतरीची विराणी
शब्द बोलू नकोस आज राणी
संथ सागराच्या लाटा किनार्यास येती
फेनफुले वाळुवरती अंथरून जाती
धुंद हृदयातुनी आर्त गाणी
हात गुंफिलेले हाती, फुले लाज गाली
मुक्या भावनांना का ही नवी जाग आली
जन्मजन्मांतरीची विराणी
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | |
चित्रपट | - | आघात (अप्रकाशीत) |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |