कशी मी सांगू राजा
कशी मी सांगू राजा, जगाचा रिवाज
दुनिया चाले उलटी, खर्याचं नाही राज
जगात जो कोणीही खोटं बोलतो
रुपया त्याचा मोठा, कुठेही चालतो
खर्याचा खिसा खाली, थापाड्या धनराज
सिनेमा नाटकात सांगून खोटं नाव
खर्याचे खोटे होता, रंकाचा होई राव
'अयोय्यो सुकुसुकु', जंगली आहे राज
दुनिया चाले उलटी, खर्याचं नाही राज
जगात जो कोणीही खोटं बोलतो
रुपया त्याचा मोठा, कुठेही चालतो
खर्याचा खिसा खाली, थापाड्या धनराज
सिनेमा नाटकात सांगून खोटं नाव
खर्याचे खोटे होता, रंकाचा होई राव
'अयोय्यो सुकुसुकु', जंगली आहे राज
गीत | - | रमेश अणावकर |
संगीत | - | सूरज |
स्वर | - | शारदा |
चित्रपट | - | ती मी नव्हेच |
गीत प्रकार | - | चित्रगीत |