A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कशी रे आता जाऊ घरी

कशी रे आता जाऊ घरी, सांग मला श्रीहरी
कशी मी आता जाऊ रे?

तव मुरलीने होता व्याकूळ
आले धावून निजता घरकुल
झाले आता जागे गोकूळ, तुझ्यासवे मी तरी

गुज निशेचे अजून नयनी
लपवू कसे बघ मिटे पापणी
ओळखिले रे दंवबिंदूंनी या भिजल्या प्रहरी

राधा तव ही सासुरवाशिण
संसाराचे भवती रिंगण
भान न त्याचे तुझेच चिंतन करित राहिले उरी
गुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.