लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज
करिती कुटाळकी तुझे ते टाळकरी
साथीला देई साथ घरची एकतारी
भोवती निंदकांचे वाजती पखवाज
ओळखते राया माझी मी पायरी
बोलतील तुझी सोयरीधायरी
जहरी बोलांचे हे जुळले तिरंदाज
होईल तेलवात स्नेहात आपोआप
जळेल जन्मोजन्मी प्रीतीचा नंदादीप
वयात यौवनाचा विखुरला साज
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | मालती पांडे |
राग | - | पहाडी |
गीत प्रकार | - | भावगीत |
पखवाज | - | एक प्रकारचे तालवाद्य. |
सोयरीधायरी | - | नात्यागोत्याची माणसे. |
शंगार हा सर्व रसांचा राजा ! भरजरी वस्त्रे परिधान करणारा. तो भगवी वस्त्रे कशी गुंडाळणार? तरी पण शंगार रसाने शांत रसाच्या घरी पाहुणा म्हणून यावे आणि त्या दोघांची जुगलबंदी चालावी, असा योग राजाभैयाजींच्या शृंगारिक कवितांनी आणून दिला. ब्रह्मचारी झाले तरी त्यांच्या सहचारिणी, मनोमय मैत्रिणी- भावना, कल्पना आणि वेदना या होत्या. वेदनेतदेखील भैयाजींनी वेदाची झलक दाखवून दिली आहे. प्रणयातदेखील प्रणवाची श्रवणातीत चाहूल लागू दिली. त्यांचा कवितासंग्रह 'मंदिका' वाचून याची साक्ष पटते.
'मंदिका'तील आपल्या निवेदनात ते म्हणतात, मेंदीसाठी 'मंदिका' हे नाव मी सुचविले आहे. मेंदीला यवनेष्टा, मदरंगी मेदिका अशी दुसरी नावे आहेत. त्यांतील 'मंदिके'चे मी 'मंदिका' करून हे शीर्षक संग्रहासाठी घेतले आहे. हातीपायी मेंदी लावून रंगणार्या मदरंगी नवोढेचा हा यौवनविलास आहे. ओल्या मेंदीमुळे हालचाली व पदन्यासही मंद होतो. मेंदी ओलेपणी रंगते आणि सुकल्यावर मात्र ती खुलते ! माझ्या या कवितासंग्रहालाही अशी मंदगतीच स्वीकारावी लागली. राजाभैया यांचे हे 'मंदिका' निमित्ताचे निवेदनही मंदाक्रान्ता वृत्तीयच म्हणावे लागेल.
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
'कविश्रेष्ठ राजा बढे- व्यक्ती आणि वाङ्मय' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.