A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कशी संपली रात

कशी संपली रात !
कळेना, कशी संपली रात !

वीणा छेडित एक कराने
कुरवाळीत तव केश दुजाने
आताच ना मी बसले होते जयजयवंती गात !

चांद अभाळी कधी उगवला
कळले नाही कधी मावळला
चढत्या-ढळत्या स्वरलहरींच्या मादक आलापात !

गुपित लाडके गीतामधले
पुन्हा पुन्हा मी ओठी घोळिले
गाण्यातच त्या विसरून गेले दोघांतील एकान्‍त !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.