कशी तुला समजाऊ
कशी तुला समजावू
प्रिया मी, कशी तुला समाजावू
तू रुसल्यावर तुझियावाचून सांग कशी मी राहू
तुला वाहिले सारे जीवन
माझे तनमन, माझे मीपण
सर्वस्वाचे दान दिल्यावर काय आणखी देऊ
थोडे भांडण थोडा रुसवा
त्यातही असतो एक गोडवा
पण थोड्यातच सारी गोडी, नकोस विसरून जाऊ
प्रीती म्हणजे अमोल मोती
मागुन का कधी येतो हाती
दोन मनांचा करून शिंपला तो सांभाळून ठेवू
प्रिया मी, कशी तुला समाजावू
तू रुसल्यावर तुझियावाचून सांग कशी मी राहू
तुला वाहिले सारे जीवन
माझे तनमन, माझे मीपण
सर्वस्वाचे दान दिल्यावर काय आणखी देऊ
थोडे भांडण थोडा रुसवा
त्यातही असतो एक गोडवा
पण थोड्यातच सारी गोडी, नकोस विसरून जाऊ
प्रीती म्हणजे अमोल मोती
मागुन का कधी येतो हाती
दोन मनांचा करून शिंपला तो सांभाळून ठेवू
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | सुधीर मोघे |
स्वर | - | रंजना जोगळेकर |
चित्रपट | - | कशासाठी? प्रेमासाठी! |
गीत प्रकार | - | चित्रगीत |