A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कटाव (३)

पेटला गडी ईरंला सोडलं घरदार
दाही दिशी सुटलं वारू प्याल्यावानी वारं

घाव जळं वर्मी चटका काळजाला
इस्तव व्हता उरी वनवा त्याचा झाला

तहान-भूक हरली त्यानं घेरलं देहभान
पेटली अशी ठिणगी, भिडली गगनाला
गीत - गुरु ठाकूर
संगीत - अजय-अतुल
स्वर- अजय गोगावले
चित्रपट - नटरंग
गीत प्रकार - चित्रगीत
ईर - शक्ती / जोर / चुरस / ईर्ष्या. (ईरेस पडणे- चुरस लावून पुडे सरसावणे.)
वर्म - दोष, उणेपणा / खूण.
वारू - नामी घोडा.