A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
खबरदार जागा जनसागर हो

खबरदार, खबरदार !
जागा जनसागर हो,
खबरदार !

घोषवीत निज विजया
सूर्यबिंब ये उदया
दश दिशा, नव उषा, गगनि रंगल्या कशा
किरणबाण प्राण हरी
अंधकार मरण वरी
लहर लहर अरुणरंग मंगलध्वजा धरी
खबरदार !

मुक्तिमंत्र हृदयि उठे
अंध-रूढि-बंध तुटे
उसळते, उकळते, तरुण रुधिर पेटते
जनमनात आग जळे
दुराचार दूर पळे
प्रलयविलयि हो युगान्‍त, नूतन प्रभात ये
खबरदार !
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
उषा - पहाट.
रुधिर - रक्त.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.