A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
खचित उगिच भय

खचित उगिच भय दापी मजला ।
असतां गुरुवरि भार सगळा ।
अशुभ घोर तो माझा सरला ॥

तापवि भानु किती जरि भूला ।
विमल मेघ परि वर्षुनि सु-जलां ।
करि तो झडकरि शांततेला ॥
गीत - ना. वि. कुलकर्णी
संगीत - मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वर- बालगंधर्व
नाटक - संत कान्होपात्रा
राग - काफी
ताल-त्रिवट
चाल-चरन धरन मन
गीत प्रकार - नाट्यसंगीत
दापणे - दटावणे.
भानू - सूर्य.
विमल - स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.