A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
खळेना घडिभरही बरसात

खळेना घडिभरही बरसात
दिवस संपला, नागिणकाळी उतरे सळसळ रात

नक्षत्रांसह दिशा लोपल्या
वाटा अंधाराने गिळिल्या
असेल कोठे सखा? पाऊले वाजति परि थेंबात

गडगडणे थांबवा घनांनो,
कडकडणे आवरा विजांनो,
बायांनो, का तुम्हाहि नकळे स्त्री हृदयाची मात

असेल आला पैलतटावर
येऊ द्या ग त्याला इथवर
संथ वहा ग सरिते तूही, येतो माझा नाथ
गीत - वा. रा. कांत
संगीत - बाळ बर्वे
स्वर- पुष्पा पागधरे
गीत प्रकार - भावगीत
खळणे - थांबणे.
मात - गोष्ट.
सरिता - नदी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.