खांद्यावरी घोंगडी हातामध्ये
खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी । घेउनिया चारीतसे धेनु सांवळा ॥१॥
राधे तुझा मुकुंद मुरारी । वाजवि वेणू नानापरि ॥२॥
सकळ तीर्थें ज्याच्या चरणांवरी लोळती ।
तो ह्मणे राधिकेसी करीन मी तुझी वेणीफणी ॥३॥
एका जनार्दनीं रचिलें रासमंडळ । जिकडे पाहें तिकडे अवघें ब्रह्म कोंदलें ॥४॥

| गीत | - | संत एकनाथ |
| संगीत | - | मधुकर पाठक |
| स्वर | - | हरिभाऊ करंजेकर |
| गीत प्रकार | - | संतवाणी, हे श्यामसुंदर |
| कांबळ | - | घोंगडी. |
| कोंदणे | - | भरून जाणे. |
| धेनु | - | गाय. |
| वेणु | - | बासरी. |
मूळ रचना
खांद्यावरी कांबळी हातामधीं काठी । चारीतसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥
राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणू कान्हा श्रीहरी ॥२॥
एकएक गौळणी एकएक गोपाळा । हातीं धरूनि नाचती रासमंडळा ॥३॥
एका जनार्दनीं रचिलें रासमंडळ । जिकडे पाहें तिकडे अवघें ब्रह्म कोंदलें ॥४॥
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.

संपूर्ण कविता / मूळ रचना