निजल्या तान्ह्यावरी माउली
निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टि सारखी धरी
तिचा कलीजा पदरीं निजला,
जिवापलीकडे जपे त्याजला,
कुरवाळुनि चिमण्या राजाला चुंबी वरचेवरी.
सटवाई, जोखाइ हसविती,
खळी गोड गालांवरि पडती
त्याची स्वप्नें बघुनि मधुर तीं कौतुकते अंतरीं.
अशीच असशी त्रिभुवनजननी,
बघत झोपल्या मज का वरुनी?
सुखदुःखांचीं स्वप्नें बघुनी कौतुकशी का खरी?

गीत | - | भा. रा. तांबे |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
राग | - | मालकंस |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- डिसेंबर १९२१, अजमेर. |
सटवाई, जोखाई | - | प्रारब्ध देवता. |
नोंद
या कवितेत त्रिभुवनजननीचे विश्वव्यापी प्रेम, कवीची कृतज्ञता व जननीस परितोष होतो आहे किंवा नाही हे पहाण्याची बालवृत्ती उत्तम रीतीने व्यक्त झाली आहे.
- 'तांबे यांची समग्र कविता' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.