A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
खेळ मांडला

तुझ्या पायरीशी कुनी सानथोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापाई
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला-
खेळ मांडला

सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार पाठीशी तू र्‍हा हुबा
ह्यो तुझ्याच उंबर्‍यात-
खेळ मांडला

उसवलं गणगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भेगाळल्या भुईपरी जीणं अंगार जिवाला जाळी
बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे
इनविती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला-
खेळ मांडला
गीत- गुरु ठाकूर
संगीत - अजय-अतुल
स्वर - अजय गोगावले
चित्रपट- नटरंग
गीत प्रकार - चित्रगीत
शिवार - शेत.
सान - लहान.

 

Random song suggestion
  अजय गोगावले