किती वानु तुला मी
किती वानु तुला मी भगवंता
चिपळ्या एकतारि वाजविता
म्हणतात दयाघन तुज सारे
तू मजवरती रुसला का रे
देवा, थकलो हरि हरि म्हणता
नामामृत माझ्या ओठि तुझे
नाही भजनाविण गीत दुजे
डोळे मिटुनी तुजसी स्मरता
आहेस विधाता जगताचा
कैवारी दीन अनाथांचा
हाकेसरशी तू धांव अतां
चिपळ्या एकतारि वाजविता
म्हणतात दयाघन तुज सारे
तू मजवरती रुसला का रे
देवा, थकलो हरि हरि म्हणता
नामामृत माझ्या ओठि तुझे
नाही भजनाविण गीत दुजे
डोळे मिटुनी तुजसी स्मरता
आहेस विधाता जगताचा
कैवारी दीन अनाथांचा
हाकेसरशी तू धांव अतां
गीत | - | अण्णा जोशी |
संगीत | - | सी. रामचंद्र |
स्वर | - | सी. रामचंद्र |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
वानणे | - | वाखाणणे. वर्णन करणे. |