किती वयाचे धराल भय
किती वयाचे धराल भय
हे प्रौढपणा सोडा
मी बाल्याच्या वनी नाचते शिव-धनू करुनी घोडा
सुवर्णचाफ्यावरती चढुनी
सपर्ण सुमने आणा खुडुनी
सुखे सख्यांनो माझ्यावरती बाण फुलांचे सोडा
दूर दूर त्या निळ्यात राही
कमल डुलतसे श्यामल रंगी
ओचे उचलून कुणीतरी ते माझ्यासाठी काढा
वनी कोण हे कुमार दोघे
काय अचानक मनात जागे
श्यामवर्ण तो वीर पाहता जीव जाहला वेडा
हे प्रौढपणा सोडा
मी बाल्याच्या वनी नाचते शिव-धनू करुनी घोडा
सुवर्णचाफ्यावरती चढुनी
सपर्ण सुमने आणा खुडुनी
सुखे सख्यांनो माझ्यावरती बाण फुलांचे सोडा
दूर दूर त्या निळ्यात राही
कमल डुलतसे श्यामल रंगी
ओचे उचलून कुणीतरी ते माझ्यासाठी काढा
वनी कोण हे कुमार दोघे
काय अचानक मनात जागे
श्यामवर्ण तो वीर पाहता जीव जाहला वेडा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | स्नेहल भाटकर |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
नाटक | - | भूमिकन्या सीता |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • नाटकाच्या मूळ संहितेत पदे नाहीत. रंगमंचीय सादरीकरणाच्या वेळेस त्यांचा अंतर्भाव करण्यात आला होता. |
सुमन | - | फूल. |