A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राघुमैना रानपाखरं गाउ

सोनसकाळी सर्जा सजला हसलं हिरवं रान
राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान!

झुळुझुळु आला पहाटवारा
हळूच जागवी उभ्या शिवारा
झाडंयेली नीज सांडती नाचनाचतं पान
राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान!

पिढ्यापिढ्यांचं पातक सरलं
शिवनेरीला शिव अवतरलं
शिवरायांच्या मंगल चरणी
पावन झाली अवघी धरणी
जयभवानी बोल गर्जती आज पाचही प्राण
शिव - मंगल, कल्याणकारी.
शिवार - शेत.