कितीदा नव्याने तुला
कितीदा नव्याने तुला आठवावे,
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे..
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी,
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी,
कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे..
किती हाक द्यावी तुझ्या मनाला,
किती थांबवावे मी माझ्या दिलाला,
कितीदा रडुनी जिवाने हसावे..
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे..
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी,
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी,
कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे..
किती हाक द्यावी तुझ्या मनाला,
किती थांबवावे मी माझ्या दिलाला,
कितीदा रडुनी जिवाने हसावे..
गीत | - | देवयानी कर्वे कोठारी |
संगीत | - | मंदार आपटे |
स्वर | - | मंदार आपटे |
चित्रपट | - | ती सध्या काय करते |
गीत प्रकार | - | चित्रगीत |