A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कोण अससि तू नकळे

'कोण अससि तू?' नकळे मजला

तू गंगेची अथांग शुचिता
की जननीची माया-ममता?

भाविकतेची मंगल गाथा
उदार-चरिता अमर देवता
नवा जन्म तू मजला दिधला
काय वदू मी नकळे तुजला
गीत - विद्याधर गोखले
संगीत - पं. राम मराठे
स्वर- पं. राम मराठे
नाटक - मंदारमाला
राग - जोगकंस
ताल-त्रिताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
शुचि - शुद्ध, पवित्र, स्वच्छ.