A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कोण दुजा आधार

कोण दुजा आधार?
तुजविण, कोण दुजा आधार?

अवतीभवती पहा दाटला अवसेचा अंधार
काजळले नभ, काजळले मन, व्याकुळले मी फार

वादळवारा झोंबत अंगा झिंगुनि हा अनिवार
पदराखाली इवली दिवली थरथरते हळुवार

कशि सावरू? कुठे निवारा? घालु कुणावर भार?
पतितपावना एक तुझे मज उघडे आता दार