कोणी नसे कुणाचे
कोणी नसे कुणाचे, सारे दयाघनाचे !
माया न माउलीला, झिडकारिले पित्याने
त्या पोरक्या ध्रुवाला कुरवाळिले प्रभूने
नाते जिवाशिवाचे, कोणी नसे कुणाचे !
भरला जळीस्थळी तो, परमेश याचि देही
छळवाद सोसुनीया प्रह्लाद गीत गाई
पुढती अनंत नाचे, कोणी नसे कुणाचे !
गाऊ किती कशी मी ही भावरम्य गाथा
अणुरूप घेउनी मी करिते विनम्र माथा
स्वर हे मुकेपणाचे, कोणी नसे कुणाचे !
माया न माउलीला, झिडकारिले पित्याने
त्या पोरक्या ध्रुवाला कुरवाळिले प्रभूने
नाते जिवाशिवाचे, कोणी नसे कुणाचे !
भरला जळीस्थळी तो, परमेश याचि देही
छळवाद सोसुनीया प्रह्लाद गीत गाई
पुढती अनंत नाचे, कोणी नसे कुणाचे !
गाऊ किती कशी मी ही भावरम्य गाथा
अणुरूप घेउनी मी करिते विनम्र माथा
स्वर हे मुकेपणाचे, कोणी नसे कुणाचे !
| गीत | - | जगदीश खेबूडकर |
| संगीत | - | प्रभाकर जोग |
| स्वर | - | आशा भोसले |
| चित्रपट | - | चुडा तुझा सावित्रीचा |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशा भोसले