कोण्या राजानं राजानं
कोण्या राजानं राजानं शेवडी खंदली
कोण्या राणीनं राणीनं पाणीजं भरलं
कोण्या राणीचा राणीचा तोडेजं हरपलं
कोण्या राजानं राजानं उचलून घेतलं
कोण्या राणीनं राणीनं तोडेजं मांगलं
कोण्या राजानं राजानं तोडेजं दिधलं
कोण्या राजाच्या राजाच्या डोल्यांत भरली
कोण्या राणीला राणीला दीठजं लागली
हा पाय शेणाचा
हा पाय मेणाचा.
बंधुनं बायको केऽली
माय पदर सोन्याचा.
हायल्या बांधती
चिमण्या कोंडती
फुलाच्या फडकीवरी
माय लगीन लाविती
केळीच्या पानावरी
माय् बामन जेविती
बंधुनं बायको केली, बाईल केली
माय पदर सोन्याचा
कोण्या राणीनं राणीनं पाणीजं भरलं
कोण्या राणीचा राणीचा तोडेजं हरपलं
कोण्या राजानं राजानं उचलून घेतलं
कोण्या राणीनं राणीनं तोडेजं मांगलं
कोण्या राजानं राजानं तोडेजं दिधलं
कोण्या राजाच्या राजाच्या डोल्यांत भरली
कोण्या राणीला राणीला दीठजं लागली
हा पाय शेणाचा
हा पाय मेणाचा.
बंधुनं बायको केऽली
माय पदर सोन्याचा.
हायल्या बांधती
चिमण्या कोंडती
फुलाच्या फडकीवरी
माय लगीन लाविती
केळीच्या पानावरी
माय् बामन जेविती
बंधुनं बायको केली, बाईल केली
माय पदर सोन्याचा
| गीत | - | ना. धों. महानोर |
| संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
| स्वर | - | आशा भोसले, वर्षा भोसले |
| चित्रपट | - | जैत रे जैत |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
| शेवडी | - | नदीच्या पात्रात खोदलेली विहीर. |
| हायली | - | हवेली. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशा भोसले, वर्षा भोसले