कोसळले गगन जरी
कोसळले गगन जरी
मी हा खंबीर उभा
पोलादी बाहूंवर
सावरीत क्षुद्र नभा
सावरीत क्षुद्र नभा
हसलो मी मुक्त हसे
प्रलयजळी बुडताना
तोच कुणी जीव दिसे
बळ असून दुर्बळ मी
शल्य वागवीत उभा
बाहूंतिल थिजले बळ
सावरीत क्षुद्र नभा
मी हा खंबीर उभा
पोलादी बाहूंवर
सावरीत क्षुद्र नभा
सावरीत क्षुद्र नभा
हसलो मी मुक्त हसे
प्रलयजळी बुडताना
तोच कुणी जीव दिसे
बळ असून दुर्बळ मी
शल्य वागवीत उभा
बाहूंतिल थिजले बळ
सावरीत क्षुद्र नभा
गीत | - | वसंत कृष्ण वर्हाडपांडे |
संगीत | - | अभिजीत राणे |
स्वर | - | सुरेश वाडकर |
गीत प्रकार | - | कविता |