कृष्णा मिळाली कोयनेला
कृष्णा मिळाली कोयनेला
तसंच माझं माहेर बाई
येऊन मिळालं सासरला
कृष्णेचं पाणी, कोयनेचं पाणी
एकरूप झालं
आलिंगनी, बाई आलिंगनी,
ओळखायचं सांगा, कसं कुणी?
संसारचं तीर्थ बांधलं
लक्ष पायर्या घाटाला
एका आईच्या पोटी येउनी
ताटतुटी जन्मापासुनी
सासर, माहेर नाव सांगुनी
नयनी नातं गहिवरुनी
बहीण भेटली बहिणीला
शतजन्माची ही पुण्याई
घेऊन आली कृष्णामाई
कोयना येई झुलवित डोई
मंगल घट ते न्हाऊ घालण्या
सुवासिनीच्या प्रीतीला
तसंच माझं माहेर बाई
येऊन मिळालं सासरला
कृष्णेचं पाणी, कोयनेचं पाणी
एकरूप झालं
आलिंगनी, बाई आलिंगनी,
ओळखायचं सांगा, कसं कुणी?
संसारचं तीर्थ बांधलं
लक्ष पायर्या घाटाला
एका आईच्या पोटी येउनी
ताटतुटी जन्मापासुनी
सासर, माहेर नाव सांगुनी
नयनी नातं गहिवरुनी
बहीण भेटली बहिणीला
शतजन्माची ही पुण्याई
घेऊन आली कृष्णामाई
कोयना येई झुलवित डोई
मंगल घट ते न्हाऊ घालण्या
सुवासिनीच्या प्रीतीला
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | भावगीत |