कृष्णाकाठी दत्तगुरुंचा नित्त्य असे
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा नित्त्य असे संचार
सुकृत आले फळास माझे, घडला साक्षात्कार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार
योगिराज श्रीसमर्थस्वामी, अवचित आले माझ्या सदनी
पदस्पर्शाने झाले पावन मम जीवन संसार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार
वैराग्याची सोज्वळ मूर्ती, अपार करुणा ह्रदयी प्रीती
प्रणव सुरांतुनी जगा दाविती विश्वरुपाचे सार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार
अंतर साक्षित्वाचा प्रत्यय सदा देती मज अखंड अक्षय
सार्थकतेचे अश्रू बघती आत्मऐक्य साकार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार
सुकृत आले फळास माझे, घडला साक्षात्कार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार
योगिराज श्रीसमर्थस्वामी, अवचित आले माझ्या सदनी
पदस्पर्शाने झाले पावन मम जीवन संसार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार
वैराग्याची सोज्वळ मूर्ती, अपार करुणा ह्रदयी प्रीती
प्रणव सुरांतुनी जगा दाविती विश्वरुपाचे सार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार
अंतर साक्षित्वाचा प्रत्यय सदा देती मज अखंड अक्षय
सार्थकतेचे अश्रू बघती आत्मऐक्य साकार
कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार
| गीत | - | व्ही. टी. पंचभई |
| संगीत | - | आर. एन्. पराडकर |
| स्वर | - | आर. एन्. पराडकर |
| गीत प्रकार | - | भक्तीगीत, दिगंबरा दिगंबरा |
| प्रणव | - | ओंकार. |
| साक्षित्व | - | साक्षित्व म्हणजे फक्त साक्षीदार बनून राहणे. अर्थात, कुठलाही निर्णय अथवा प्रतिक्रिया न देता आपल्या भावना, विचार व कृती यांच्याकडे बघणे (तटस्थ अवलोकन). ज्यामुळे व्यक्तीला ध्यानाद्वारे आंतरिक शांतता मिळते आणि तो स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून घेऊ शकतो. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आर. एन्. पराडकर