कृरता मातली हेच सौभाग्य
कृरता मातली हेच सौभाग्य का?
कोटि जन तारणे हे नसे वैध का?
लौकिकार्थास भ्यावेस रणचंडिके
अग्नीदिव्याविना लाभते तेज का?
कोटि जन तारणे हे नसे वैध का?
लौकिकार्थास भ्यावेस रणचंडिके
अग्नीदिव्याविना लाभते तेज का?
गीत | - | शांताराम नांदगावकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | अजितकुमार कडकडे |
नाटक | - | कैकेयी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • या 'कैकेयी' नाटकाच्या लेखिका ललिता बापट आहेत. 'कैकयी’ हे वि. वा. शिरवाडकरांचे जे नाटक आहे, ते वेगळे. |
मातणे | - | उन्मत्त होणे. |