कुलवधू
माझी डोली चालली ग दूरदेशी नव्या गावा
तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्नांचा रावा
तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ
तिथले ऊनपाऊस भरतील माझी ओंजळ
स्वप्न राही मागे आता व्यथा सतत उरात
नव्या उंबर्याची आस जागे तरीही मनात
एक नदी सारखी वाहते मी जणू
पाऊलखुणा ठेवून मागे, चालले मी कुलवधू
तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्नांचा रावा
तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ
तिथले ऊनपाऊस भरतील माझी ओंजळ
स्वप्न राही मागे आता व्यथा सतत उरात
नव्या उंबर्याची आस जागे तरीही मनात
एक नदी सारखी वाहते मी जणू
पाऊलखुणा ठेवून मागे, चालले मी कुलवधू
गीत | - | अश्विनी शेंडे |
संगीत | - | निलेश मोहरीर |
स्वर | - | वैशाली भैसने-माडे |
गीत प्रकार | - | मालिका गीत |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- कुलवधू, वाहिनी- झी मराठी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.