A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुणाला प्रेम मागावे

कुणाला प्रेम मागावे?
जिवाचे दु:ख सांगावे?
मृगजळी का तरंगावे
कुणाला गात रंजावे?

तूच ना प्रीतिचा पेला
दिला पण पालथा केला
तळमळे जीव तान्हेला
कुणासाठी जगी जगावे?

तुझ्या शृंगारलीला या
बिचारी मोहिनीमाया
किती आशेवरी वाया-
खुळ्या जिवास टांगावे?

साथीचा साज विस्कटला
सूरांचा मेळ मग कुठला
दिलाचा दिलरूबा फुटला
कसे गाणे अतां गावे?
गीत - स. अ. शुक्ल
संगीत -
स्वर- मास्टर बसवराज
गीत प्रकार - भावगीत
रंजवण - मनाचे रंजन करणारे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.