कुणी आलं कुणी आलं
कुणी आलं कुणी आलं, जीवाला वेड लावून गेलं
नाही ठाऊक नांव
नाही माहीत गाव
मला पाहून उगीच हंसलं, उगीच हसलं, उगीच हसलं
होते आंबेवनात
गीत मजेत गात
तोच पाल्यांत पाऊल वाजलं, पाऊल वाजलं, पाऊल वाजलं
गोड सकाळचा पार
वारं झुळुझुळु गार
फूल उंबराचं अवचित फुललं, अवचित फुललं, अवचित फुललं
गाणं राहिलं गळ्यांत
दृष्टी फिरली मळ्यांत
टोंक फेट्याचं पिकांत लपलं, पिकांत लपलं, पिकांत लपलं
त्याच्या नजरेची धार
भेदी जीवास पार
त्यानं चोरून काळीज नेलं, काळीज नेलं, काळीज नेलं

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | बबनराव नावडीकर |
गीत प्रकार | - | भावगीत |