A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुणी गोविंद घ्या

कुणि गोविंद घ्या, कुणि गोपाळ घ्या
या ग सयांनो, या ग या
अविनाशी हा आनंद घ्या
चिरंतनाचा सुगंध घ्या

नभात फुलवी गोड चांदण्या, बाळच ग हसतो
महाराष्ट्राचे भाग्य उद्याचे मुठीत नाचवितो
दुष्टांना का हुंकारुन ग दहशत हा भरतो
राजफुलाचा विकास घ्या,
चैतन्याचा सुहास घ्या

चार दिशांचे चौखुर सुंदर पृथ्वीच्या पाळणी
नक्षत्रांचे छत्रकमल हे झुलत्या सिंहासनी
हसवा रिझवा शिवरायाला जो जो ग गाउनी
युगायुगाचा सारंग घ्या,
क्रांतीचा हा आरंभ घ्या

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.