कुणीही पाय नका वाजवू
कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू
चाहुल देऊन नका कुणी ग चिमण्याला जागवू
नकोस चंद्रा येऊ पुढती, थांब जरासा क्षितिजावरती
चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू
पुष्करिणीतुन गडे हळुहळु, जललहरी तू नको झुळुझुळु
नकोस वार्या फुलवेलींना फुंकरिने डोलवू
नकोस मैने तोल सावरू, नकोस कपिले अशी हंबरू
यक्षपर्यांनो स्वप्नीं नाचुन नीज नका चाळवू
जगावेगळा छंद ग याचा, पाळण्यातही खेळायाचा
राजी नसता अखेर थकुनी पंख मिटे पाखरू

गीत | - | श्रीनिवास खारकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | मालती पांडे |
गीत प्रकार | - | भावगीत |
पुष्करिणी | - | तळे. |
यक्ष | - | उपदेवता, इंद्राचे सेवक. |