मंत्र जपतांचि हा दुरित-तम भंगते
जेथ ना हीनता, मलिनता ना जिथें
दिव्य लोकीं अशा अढळपद लाभतें !
गीत | - | विद्याधर गोखले |
संगीत | - | गोविंदराव अग्नि |
स्वर | - | विश्वनाथ बागुल |
नाटक | - | चमकला धृवाचा तारा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, प्रार्थना |
तम | - | अंधकार. |
दुरित | - | पाप. |
पण 'साळुंकी बोले मंजुळशी वाणी । बोलविता धनी वेगळाची' या सुभाषिताचा प्रत्यय मला आणून देण्यासाठींच की काय, 'कला-मंदिर' या प्रथितयश संस्थेचे संचालक नि जुने-जाणिते निर्माते नटवर्य गोपिनाथ सावकार यांनी मला याच विषयावर नाटक लिहिण्याची आग्रहपूर्वक फर्माईश केली. कारण या विषयाच्या मूलभूत नाट्यमयतेविषयीं, तसेंच व्यावहारिक यशाविषर्थी, त्यांना खात्री होती आणि आपल्या एकसष्ठी समारंभाच्या सुमारास रंगभूमीवर येणारे आपल्या संस्थेचें नाटक भक्तिरस प्रधानच असावे; हरिनामाचा गजर दुमदुमविणारेंच असावें; बंधुभाव, मातृभक्ति, प्रखर तपस्या यांचा आदर्श नवयुवकांपुढे ठेवणारे असावें; अशी त्यांची उत्कट मावना होती. सावकारांच्या या सद्भावनेला मी मान दिला. गेल्या राम नवमीच्या मंगल मुहूर्तावर हें नाटक लिहिण्यास सुरवात केली आणि आज तें रंगभूमीवर रसिकांच्या सेवेसी थाटामाटांत उभे राहिलें आहे.
(संपादित)
विद्याधर गोखले
'चमकला ध्रुवाचा तारा' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- विद्यानंद सरस्वती प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.