कुंजात विहरतो सुगंध शिंपित
कुंजात विहरतो सुगंध शिंपित वारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !
हृदयात छेडती कोमल सूर सतारी
उमटले अनामिक स्वप्न मनाच्या दारी
मज आशय कळला तुझ्या प्रीतीचा सारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !
रंगात अबोली थरारता ओठांत
राहु दे सुरंगी पाचुपंख बोटांत
बिलगली पाखरे कळ्यांस देत इशारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !
बहरात फुलांच्या कमान झुकली खाली
अंगात उमलुनी तिथे पौर्णिमा आली
बरसल्या अंतरी इथे सुखाच्या धारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !
हृदयात छेडती कोमल सूर सतारी
उमटले अनामिक स्वप्न मनाच्या दारी
मज आशय कळला तुझ्या प्रीतीचा सारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !
रंगात अबोली थरारता ओठांत
राहु दे सुरंगी पाचुपंख बोटांत
बिलगली पाखरे कळ्यांस देत इशारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !
बहरात फुलांच्या कमान झुकली खाली
अंगात उमलुनी तिथे पौर्णिमा आली
बरसल्या अंतरी इथे सुखाच्या धारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !
| गीत | - | गुरुनाथ शेणई |
| संगीत | - | वीरधवल करंगुटकर |
| स्वर | - | कृष्णा कल्ले |
| गीत प्रकार | - | भावगीत |
| कुंज | - | वेलींचा मांडव. |
| सुरंगी | - | एक प्रकारचे सुगंधी फूल / एक प्रकारच्या अत्तराचे नाव. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












कृष्णा कल्ले