A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लाडके झालीस तू पाहुणी

ज्याची त्याला ठेव अर्पुनी, सरली गोड कथा
कन्यादानातुनी उपजली हळवी एक व्यथा
माहेराची माया जळते लज्जाहोमातुनी
लाडके, झालीस तू पाहुणी !

दुधातुपाने न्हाऊन बाळे वाढलीस या घरी
भातुकलीच्या खेळामधली होतीस तू नवरी
वठल्या देही फुटे हुंदका, करिता पाठवणी

माय पक्षिणी असता दिधला कुशीत या आसरा
वात्सल्याला पीळ पाडुनी चाललास पाखरा
भरल्या डोळ्यांतुनी वाहती, ओल्या आठवणी
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर- सुधीर फडके
चित्रपट - पाहुणी
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.