लागेना रे थांग तुझ्या
लागेना लागेना रे थांग तुझ्या हृदयाचा
शांत किनार्यापरी पाहसी खेळ धुंद लहरींचा
कितिक लाटा धावत येती, अपुले हितगुज सांगु पाहती
भाव तुझ्या परि मुद्रेवरती अबोल पाषाणाचा
तुला न दिसते तुला न कळते, तुझ्यात किती मी रंगुन जाते
धरशिल का रे माझ्यासंगे सूर प्रेमगीताचा
प्रेमभावना क्षणाभराची, भूलच केवळ माझीतुमची
दोन पाखरे दुरावयाची, काय नेम दैवाचा

गीत | - | यशवंत देव |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी |
चित्रपट | - | माझा मुलगा (१९७६) |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
हितगूज | - | हिताची गुप्त गोष्ट. |