पावसा ये रे पावसा
पावसा ये रे पावसा, दे जिवाला दे भरवसा
देते कधीची तुला हाक माझी तृषा
बघ जिवाची किती होतसे काहिली
ही घनांची कवाडे आता कर खुली
धीर नाही रे फारसा-
देते कधीची तुला हाक माझी तृषा
अंबराचा तुझा देश सोडून ये
आसवे सांगती तूच दाटून ये
दे तुझा दे दिलासा-
देते कधीची तुला हाक माझी तृषा
देते कधीची तुला हाक माझी तृषा
बघ जिवाची किती होतसे काहिली
ही घनांची कवाडे आता कर खुली
धीर नाही रे फारसा-
देते कधीची तुला हाक माझी तृषा
अंबराचा तुझा देश सोडून ये
आसवे सांगती तूच दाटून ये
दे तुझा दे दिलासा-
देते कधीची तुला हाक माझी तृषा
गीत | - | चंद्रशेखर सानेकर |
संगीत | - | अवधूत गुप्ते |
स्वर | - | अवधूत गुप्ते |
गीत प्रकार | - | ऋतू बरवा, भावगीत |
काहिली | - | उकाडा / आग / तळमळ. |