A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लख लख चांदणं

लख लख चांदणं कोजागरीचं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं!

चंदेरी फुलांच्या गोफुन माळा
चल ये सजणे घाल माझ्या गळा
झिमझिम शिंपीत प्रीतिचं चांदणं
जोडीनं गोडीनं फिरायचं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं!

कुणी नाही इथं हिरव्या रानात
गुलाबी गुपीत सांग माझ्या कानात
खसखस पिकली पिंपळ पानात
खुदकन मनात हसायचं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं!

तेजाचा पाऊस भुईवर पडतोय
प्रीतिचा पारवा नभात उडतोय
फेर धरी चांदवा नाचते पुनवा
रंगात ढंगात नाचायचं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं!

 

  आशा भोसले, दशरथ पुजारी