A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लक्ष्मी तू या नव्या

नकोस नयनीं भरु आसवे देऊ नको हुंदके
लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस ग लाडके

तुझ्या पाऊली येईल आता
आनंदाची अमोल सरिता
घरकुल आमुचे प्रसन्‍नतेने होईल ग बोलके

इथे अंगणी किती नाचतिल
तुझ्या स्मितासम सुमने चंचल
तुझ्याच वात्सल्यातुन येतिल या सदनी माणिके

नको बावारु मुली अशी तू
मनी न ठेवी कसला किंतू
तुझ्या गुणांची गंगा अम्हां पाहू दे कौतुके