लावियले नंदादीपा
लावियले नंदादीपा तुवा मंदिरात
भक्तिभाव धरुनी केली आणि तेलवात
तिमिर गूढ गाभार्यात
पाजळता दीपज्योत
हसे तिथे मांगल्याचे तेज मूर्तिमंत
जीर्ण परि देव्हार्यात
तुझी तुला दिसता मूर्त
मालविला दीपक का तू कोपलीस व्यर्थ
भक्तिभाव धरुनी केली आणि तेलवात
तिमिर गूढ गाभार्यात
पाजळता दीपज्योत
हसे तिथे मांगल्याचे तेज मूर्तिमंत
जीर्ण परि देव्हार्यात
तुझी तुला दिसता मूर्त
मालविला दीपक का तू कोपलीस व्यर्थ
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | व्ही. डी. अंभईकर |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | भावगीत |
गाभारा | - | देवालयात देवाची मूर्ती असते तो अंतर्भाग. |