A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लेझिम चाले जोरात

लेझिम चाले जोरात !

दिवस सुगीचे सुरू जाहले
ओला चारा, बैल माजले
शेतकरी मन प्रफुल्ल झाले
छन खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम
लेझिम चाले जोरात !

दिवटी फुरफुर करू लागली
पटक्यांची वर टोके डुलली
रांग खेळण्या सज्ज जाहली
छन खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम
लेझिम चाले जोरात !

भर भर डफ तो बोले घुमुनी
लेझिम चाले मंडल धरुनी
बाजुस, मागे-पुढे वाकुनी
छन खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम
लेझिम चाले जोरात !

पहाट झाली, तारा थकल्या
मावळतीला चंद्र उतरला
परि न थकला लेझिम मेळा
छन खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम
लेझिम चाले जोरात !
गीत- श्रीधर बाळकृष्ण रानडे
संगीत - वसंत देसाई
स्वर - जयवंत कुलकर्णी , फैय्याज , विविध गायक कलाकार
गीत प्रकार - बालगीत कविता
दिवटी - लहान मशाल.
पटका - फेटा / निशाण / ध्वज / ( जरीपटका - मराठ्यांचे निशाण ).
सुगी - हंगाम, सुकाळ.

 

  जयवंत कुलकर्णी, फैय्याज, विविध गायक कलाकार