लोचनींची नीज माझ्या
लोचनींची नीज माझ्या रोज कोणी चोरिते
जागते मी आणि स्वप्नी रम्य लेणी कोरिते
कल्पनेचे शिल्प आता आकारते या उरी
एक मूर्ती रूप घेते या मनाच्या मंदिरी
मुग्ध प्रीतीवाचुनी का धर्म दुसरा नारिते
या मनाच्या मंदिरी या काय सांगू आणखी
मूर्तिची त्या ऐट आहे थेट तुमच्यासारखी
हास्यरेखा ओठींची त्या मजसी सौख्ये भारिते
साधला जो भाव मजसी शिल्प तुमचे थाटता
येईना का लोचनी तो नाथ, तुम्ही भेटता
लाजते का त्या क्षणी मी, उगिच पदरा वारिते?
जागते मी आणि स्वप्नी रम्य लेणी कोरिते
कल्पनेचे शिल्प आता आकारते या उरी
एक मूर्ती रूप घेते या मनाच्या मंदिरी
मुग्ध प्रीतीवाचुनी का धर्म दुसरा नारिते
या मनाच्या मंदिरी या काय सांगू आणखी
मूर्तिची त्या ऐट आहे थेट तुमच्यासारखी
हास्यरेखा ओठींची त्या मजसी सौख्ये भारिते
साधला जो भाव मजसी शिल्प तुमचे थाटता
येईना का लोचनी तो नाथ, तुम्ही भेटता
लाजते का त्या क्षणी मी, उगिच पदरा वारिते?
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | गांठ पडली ठका ठका |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
वारणे | - | दूर करणे / हाकणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.