A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माती सांगे कुंभाराला

माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी !

मला फिरविशी तू चाकावर
घट मातीचे घडवी सुंदर
लग्‍नमंडपी कधी असे मी कधी शवापाशी !

वीर धुरंधर आले, गेले
पायी माझ्या इथे झोपले
कुब्जा अथवा मोहक युवती अंती मजपाशी !

गर्वाने का ताठ राहसी?
भाग्य कशाला उगा नासशी?
तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी !
गीत - मधुकर जोशी
संगीत - गोविंद पोवळे
स्वर- गोविंद पोवळे
गीत प्रकार - भावगीत
कुब्जा - कंसदासी, तीन ठिकाणी वक्र होती. हिला कृष्णाने सरळ केले.
ललाट - कपाळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.