मायबाप टाकुन गेले
मायबाप टाकुन गेले तुला नभाखाली
अनाथ ना असशी परि तू देव तुझा वाली
कुण्या आडरानी प्रसवे पुत्र दोन सीता
मुनी वाल्मिकी ना शिणला त्यांस जोजवीता
तेच बाळ जिंकिती रामा पुढे यथाकाली
उपजताच जननी-जनके कृष्ण दूर केला
गोकुळात नंदघरी तो वीर थोर झाला
कूस देवकीची त्याने धन्यधन्य केली
भाग्यदेव माझी त्याची मूर्त सानुली तू
तुझी माय व्हावे मी हा ईश्वरीय हेतू
आसवेच तुझियासाठी दुग्धरूप झाली
अनाथ ना असशी परि तू देव तुझा वाली
कुण्या आडरानी प्रसवे पुत्र दोन सीता
मुनी वाल्मिकी ना शिणला त्यांस जोजवीता
तेच बाळ जिंकिती रामा पुढे यथाकाली
उपजताच जननी-जनके कृष्ण दूर केला
गोकुळात नंदघरी तो वीर थोर झाला
कूस देवकीची त्याने धन्यधन्य केली
भाग्यदेव माझी त्याची मूर्त सानुली तू
तुझी माय व्हावे मी हा ईश्वरीय हेतू
आसवेच तुझियासाठी दुग्धरूप झाली
| गीत | - | ग. दि. माडगूळकर |
| संगीत | - | दत्ता डावजेकर |
| स्वर | - | सुमन कल्याणपूर |
| चित्रपट | - | वैशाख वणवा |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












सुमन कल्याणपूर