A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मधुकर वनवन फिरत

मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला,
भोगी पुष्पमाला; अभिनव कुसुम मधुपा
सहज सुखविती नूतन शृंगाराला ।

भ्रमर सुरस वनिं दिसला कमला टाकुनि;
कच अदय भयद झाला; कोमेजलें सुमनदल,
दुखवि मजला ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वराविष्कार- बालगंधर्व
मधुवंती दांडेकर
आशा खाडिलकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - विद्याहरण
राग - देस, सोरठ
ताल-एक्का
चाल-पियाकरधर देखो धरकत है मोरि छतिया
गीत प्रकार - नाट्यसंगीत
गुंजारव - भुंग्याचा गुणगुण नाद.
भयद - भिती उत्‍पन्‍न करणारा.
मधुकर - भ्रमर, भुंगा.
मधुप - भुंगा, भ्रमर.
सुमन - फूल.
सुरस - मधुर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  बालगंधर्व
  मधुवंती दांडेकर
  आशा खाडिलकर